Sunday, June 23, 2013

A story in ten words

Singularity. Big bang. Galaxies. Sun. Earth. Evolution.Humans. Story continues!

Tuesday, January 29, 2013

अंगाई

अक्कडबाज मिशांचा फक्कडबाज वाघोबा
काळ्या काळ्या रंगाचा इवला इवला उंदरोबा
दोघे होते खेळत, खूप होते हसत
चेंडू उडला हवेत, गेला सशाच्या कवेत
ससा धावे सुसाट, वाघ आला घुश्श्यात
वाघाने फोडली डरकाळी, घरट्यातली पाखरं जागी झाली
पाखराची माय, म्हणते काय? पिल्ला, माझ्या झोपी जाय...झोपी जाय

चांदोबाची गंमत

चांदोबा जेव्हा शाळेत गेला
तीन तास अभ्यास केला.
चांदोबाला मग भूक लागली
तूप रोटी फस्त केली.
चांदोबाची भूक भागेना
काय करावे कळेना.

वर्गात होते शंभर तारे
चांदोबाचे दोस्त सारे.
डब्यात तार्‍यांच्या होता भात
चांदोबानी चाटून केला साफ.
चांदोबाची ढेती टम्म फुगली
आणि छोटी ढेकर आली.

चांदणी होती वर्गात
खुदकन हसली गालात.
तारे हसले खो खो खो...
चांदोबा रडला धो धो धो...

रुसून चढला झाडावर
चांदोबा शाळा सुटल्यावर.
काही केल्या उतरेना
चांदोबा रुसवा सोडेना.
बघता बघता रात्र झाली
वार्‍यासोबत थंडी आली.

चांदोबाला आठवली आईची कुशी
धपकन खाली मारली उडी
घसरला पाय उजवा
मैदानात झाला आडवा.
पांढरा शर्ट धुळीत मळला
चांदोबावर डाग पडला.
धूम घरी पळून गेला
आईच्या कुशीत झोपून गेला.

Thursday, November 22, 2012

स्पर्श

आकाशातला चंद्र, ढगांचा पडदा, 
वार्‍याची सळसळ, पाण्यातल्या लाटा,
काजव्याची पणती, अंधाराच्या वाटा,
किड्यांच्या कानगोष्ट, फुलांचा सडा,
तुझा एक स्पर्श, आणि मग..मग रात्र होईल पूर्ण. 

लोरी

आजा आजा निंदिया रानी, 
जागे मेरी गुडिया प्यारी
जल्दी से तू आजा, 
अखियों में समा जा

टीम टीम करते तारे सारे 
चंदा मामा हो गए आधे
चुप है जग यह सारा 
चुपके चुपके आना

बाते तुझसे कितनी करनी
कहानी आधी रह गयी कल की
पूरी अब तू कर जा
और नयी बतला जा 

मिटती मिटती पलकें बोले 
थकती थकती सांसे पूछे 
गाँव कहाँ सपनों का? 
संग मुझे तू ले जा 

 

कप

कप ठेवला टेबलावर
माशी बसली कपावर
माशी बघते वाकून
कप गोल आतून
कप होता निसरडा
माशीचा पाय घसरला
माशी रडली घाबरून
दूध गेलं सांडून
तिकडून आले झुरळोबा  
म्हणती दूध चाखू जरा
दूध होतं गोड गोड
झुळरोबा नाचले गोल गोल
धपकन पडले कपात
माशी हसली जोरात
 
 

जिंदगानी

चलती जाये चालती जाये, जिंदगानी रे
गम मिले या खुशी, मुस्कुराना रे

आज का सुरज उगा चला, चलते चलते डूब गया
दिन अभी था रात हुई, खत्म कहानी रे

आज था जो वह कल हुआ, एक गुजरा पल हुआ
यादो की जंगल में खोया, भूला किस्सा रे

कितनी यादे कितने बाते, चलती जाए अपनी राहे
रोये किस पे किस बहाने, रुका न कोई रे

चलते चलते जिंदगानी, बीत जाये रे
कुछ रहे न बाकी बस, गीत सुहाने रे