Thursday, November 22, 2012

कप

कप ठेवला टेबलावर
माशी बसली कपावर
माशी बघते वाकून
कप गोल आतून
कप होता निसरडा
माशीचा पाय घसरला
माशी रडली घाबरून
दूध गेलं सांडून
तिकडून आले झुरळोबा  
म्हणती दूध चाखू जरा
दूध होतं गोड गोड
झुळरोबा नाचले गोल गोल
धपकन पडले कपात
माशी हसली जोरात
 
 

No comments:

Post a Comment