Tuesday, January 29, 2013

अंगाई

अक्कडबाज मिशांचा फक्कडबाज वाघोबा
काळ्या काळ्या रंगाचा इवला इवला उंदरोबा
दोघे होते खेळत, खूप होते हसत
चेंडू उडला हवेत, गेला सशाच्या कवेत
ससा धावे सुसाट, वाघ आला घुश्श्यात
वाघाने फोडली डरकाळी, घरट्यातली पाखरं जागी झाली
पाखराची माय, म्हणते काय? पिल्ला, माझ्या झोपी जाय...झोपी जाय

1 comment:

  1. गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त आहे तुमचा ब्लॉग. मनापासून आवडला.

    ReplyDelete