Trying to capture this beauty in Marathi. If anything is wrong with the following poem then it is my limitation as a poet.
निवड
रानातल्या वाटेला दोन फाटे फुटलेले
'ही' वाट की 'ती' वाट? विचारत पहुडलेले
वाटांचं द्वैत आणि माझ्या अस्तित्वाचं अद्वैत
निवडीचं कोडं वाटांइतकचं प्राचीन
गवतात हरवल्या 'ह्या' वाटेचा शेवट काय कळेना
'त्या' वाटेचाही थांग लागता लागेना
थोडी न रुळलेली 'ही' वाट माझ्या पावलांना खुणावणारी
'ती'ही वाट जवळपास तशीच पावलांसाठी आसुसलेली
गळल्या पानांच्या भाकरीवरचं दवाचं लोणी
दोन्ही वाटांवर तसंच नितळ अस्पर्श
शेवटी ठरवलं, 'ही' वाट आज अन ती वाट उद्या
'ह्या' वाटेवरून परतायची खात्री नसतानाही ठरवलं
खूप खूप वर्षांनी सांगीन एक सुस्कारा सोडून
रानातल्या वाटेला दोन फाटे फुटलेले
मी निवडली न रुळलेली वाट
आजचा मी, कारण एकच, निवडलेली वाट
मूळ कविता खूपच सुंदर आहे... आणि हा अनुवाद ही छान झालाय.
ReplyDeleteमला सर्वात जास्त काही आवडलं तर कवितेचा शेवट - "आजचा मी, कारण एकच, निवडलेली वाट"
इतक्या चांगल्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.