Monday, September 19, 2011

एक कळी

कधी तुला मी पाहते
कधी तुला मी ऐकते
तुझीच आस तन्मनी
तुला स्मरून हासते.

जरी उभा समोर तू
तुला न काही सांगते
ओंजळीतल्या तुझ्या
कळीस 'उमल' सांगते.